esakal | बारामतीचा कोरोनाचा आलेख खाली येतोय, तरी काळजी घ्यायलाच हवी!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona cases graph began to come down in Baramati


काल बारामतीत आरटीपीसीआरच्या 164 तर रॅपिड अँटीजेनच्या 126 अशा एकूण 290 चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरचे 34 तर अँटीजेनचे 36 असे एकूण 70 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. चाचण्यांची संख्या सर्वसाधारपणपणे तीनशेच्या घरात असून आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळू लागला आहे.

बारामतीचा कोरोनाचा आलेख खाली येतोय, तरी काळजी घ्यायलाच हवी!

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा संथ गतीने का होईना पण कमी होऊ लागल्याने प्रशासनाने आता सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान लक्षणे असलेल्या रुग्णाची रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा संबंधित रुग्णाची आरटीपीसीआर तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने घेतल्याने कोरोना सोबत घेऊन फिरणारे रुग्ण आता यातून समोर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल बारामतीत आरटीपीसीआरच्या 164 तर रॅपिड अँटीजेनच्या 126 अशा एकूण 290 चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरचे 34 तर अँटीजेनचे 36 असे एकूण 70 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. चाचण्यांची संख्या सर्वसाधारपणपणे तीनशेच्या घरात असून आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळू लागला आहे. बारामतीतील रुग्णसंख्या जरी 2787 इतकी झाली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1707 इतकी झाली आहे. मृत्यूचा आकडा आता 69 इतका झाला आहे. आज शहरातील 30 तर ग्रामीण भागातील 40 जणांना संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. 


दरम्यान सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग कार्यान्वित झाला असून रुग्णांवर तातडीने उपचारही सुरु झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व डॉ. महेश जगताप यांनी दिली. दरम्याऩ उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी कालपासून रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीसाठी सहायता कक्ष सुरु केल्याने त्याचाही लोकांना उपयोग होणार आहे.  बेडची उपलब्धता, रुग्णवाहिकेची मदत, बिलासंदर्भातील तक्रारी किंवा औषधांची उपलब्धता या बाबत शासकीय अधिकारी लोकांना मदत करतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शासकीय व खाजगी प्रयोगशाळांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णाची रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्याची आरटीपीसीआर तपासणी करणे आजपासून अनिवार्य झाले आहे, त्या मुळे लक्षणे असलेल्या रुग्णाचे दोन स्वॅब तपासणीदरम्यानच घेतले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

सोमवारपासून बारामतीचे जनजीवन सुरळीत सुरु झाले असून दुकाने बंद करण्याची वेळ संध्याकाळी सातपर्यंत केलेली असल्याने आता गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2787
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 1011
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 69
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 485
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 373
•    मध्यम लक्षणे असलेले- 62
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 59
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 32
•    बरे झालेले एकूण रुग्ण- 1707

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 23
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 84
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 155
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 37 
•    नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 23
•    बारामती हॉस्पिटल- 31
•    विविध खाजगी रुग्णालय- 112
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 541
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 5

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा