कोरेगाव मूळ येथे आढळला कोरोनाबाधित रुग्ण 

Corona Tes
Corona Tes

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील एक पन्नास वर्षीय कामगार कोरोनाबाधित असल्याचे सोमवारी (ता. 25) आढळून आला आहे. संबंधित कामगार कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील रहिवासी आहे. त्यामुळे पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधितांची संख्या पंधरावर पोचली आहे. 

हडपसर परिसरातील नामांकित काम करणारे मात्र पूर्व हवेलीत राहणारे तब्बल तीन कामगार व एका कामगाराचा सहा वर्षीय मुलगा, असे चार जण मागील चार दिवसांच्या कालावधीत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यापुढील काळात कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेची अधिकाअधिक काळजी घ्यावी, अशी अपेक्षा कामगारांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. 

हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील कांही कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कंपनी व्यवस्थापनाने चार दिवसांपूर्वी केलेल्या कामगारांच्या कोरोना टेस्टमध्ये आळंदी म्हातोबाची येथील एक; तर मांजरी बुद्रूक हद्दीतील, एक असे दोन कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आळंदी म्हातोबाची येथील कामगारांच्या संपर्कात आलेल्या आठ नातेवाइकांची कोरोना टेस्ट केली. त्यात कोरोनाबाधित कामगारांच्या सहा वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे काल (रविवारी) आढळून आले होते. आळंदी म्हातोबाची पाठोपाठ वरील कंपनीत काम करणारा कोरेगाव मूळ येथील आणखी एका कामगार पॉझिटिव्ह आढळून आल्याने पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, हडपसर परिसरातील वरील कंपनीमधील पन्नास वर्षीय कामगाराचा रिपोर्ट सोमवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आढळून आला असून, संबंधित कामगारावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संबंधित कामगारांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या पाच नातेवाइकांना मंगळवारी सकाळी कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात नेले जाणार आहे. या कामगाराचा रिपोर्ट आल्यापासून कोरगाव मूळ हा कटेंन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 

आणखी दोघांचे रिपोर्ट वेटिंगवर 
कदमवाकवस्ती हद्दीतील स्वामी विवेकानंद नगरमधील एक बासष्ट वर्षीय आजोबा व त्यांचा दोन वर्षीय नातू, असे दोन जण कोरोना बाधित असल्याचे तीन दिवसांपूर्वी आढळून आले होते. आजोबांच्या संपर्कात आलेल्या नऊपैकी सात नातेवाइकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले असले, तरी संबंधित आजोबांच्या दोन्ही मुलांचे रिपोर्ट मात्र अद्याप वेटींगवर आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com