esakal | जिल्हा बॅंकेमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

corona-j.jpg

इंदापूर तालुक्यातील उद्धटमध्ये कोरोनाचा रुग्ण.
पश्‍चिम भागातील कोरोना रुग्णाची संख्या पोहचली १३ वर.

जिल्हा बॅंकेमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोनाचा संसर्ग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर : उद्धट (ता. इंदापूर) येेथे कोरोनाचा रुग्ण आढळला. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कोरोना रुग्णांची संख्या तेरावर पोहचली असून, सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनचे नियम शिथील केल्यानंतर इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली. उद्धट मुळ गाव असणाऱ्या व जिल्हा बॅंकेमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्याला आज कोरानाची लागण झाल्याचे प्रशासनाने सांगितले. 

उद्धटच्या रुग्णाच्या संपर्कात ६ जण...
उद्धटमधील कोरोना रुग्णाच्या संपर्कामध्ये ६ नागरिक आले असून याच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

काटेवाडीमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह बोरीमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व ४ कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या इंदापूर व बारामती तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला.

loading image
go to top