esakal | बारामतीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले

शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. बारामतीत आज 280 जण पॉझिटीव्ह आढळले. बारामतीची स्थिती दिवसेंदिवस आटोक्याच्या बाहेर जाऊ लागली आहे.

बारामतीतील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोनारुग्णांच्या संख्येने आज त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. बारामतीत आज 280 जण पॉझिटीव्ह आढळले. बारामतीची स्थिती दिवसेंदिवस आटोक्याच्या बाहेर जाऊ लागली आहे. रुग्णसंख्या याच वेगाने वाढू लागली तर बारामतीतील रुग्णालयात बेडस उपलब्ध होणार नाहीत, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढू लागला आहे. 

दारु आणि इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ब्रिटनमध्ये झालं संशोधन​

 बारामतीतील तपासणीच्या संख्येनेही आज विक्रम पार केला. आज बारामतीत शासकीय स्तरावर तब्बल 601 तपासण्या झाल्या तर खाजगी व इतर मिळून 211 तपासण्या झाल्या. तपासण्यांची संख्या वाढायला लागल्याने आता रुग्णांचीही संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येने आता त्रिशतकाकडे वाटचाल सुरु केल्यानंतर नेमक्या काय उपाययोजना कराव्यात हेच प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. असे असूनही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आता रुग्णालयातील खाटांची कमतरता बारामतीत भासू लागली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे हेही आज कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. 

आज शासकीय महिला रुग्णालयानजिक नर्सिंग वसतिगृहातील 76 खाटांच्या क्षमतेचे तात्पुरते रुग्णालय सुरु झाले. पहिल्याच दिवशी ऑक्सिजनवरील 16 रुग्ण येथे दाखल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकरी अभियंता मिलिंद बारभाई, अभियंता प्रसाद पाटील यांच्यासह नगरसेवक सुधीर सोनवणे, बिरजू मांढरे तसेच अभिजीत चव्हाण, साजन लालबिगे, अजिज शेख आदींनी हे रुग्णालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. दरम्यान बारामतीतील अहिल्यादेवी होळकर वसतिगृहातील 60 व एमबीए महाविद्यालयाच्या वसतिगृहातील 220 खाटांची क्षमता नव्याने उपलब्ध होणार आहेत. 

दाखल रुग्ण संख्या
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 134
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 32
•    बारामती हॉस्पिटल- 56
•    इतर रुग्णालय- 652

कोविड केअर सेंटरमधील रुग्ण संख्या
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 213
•    डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह- 92
•    तारांगण वसतिगृह- 101
•    माळेगाव इंजिनिअरिंग वसतिगृह- 199

पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीची आजची स्थिती
•    कालचे (ता. 7) तपासलेले नमुने- 812
•    पॉझिटीव्ह आलेल्यांची संख्या- 280.
•    बारामती शहर- 169 बारामती ग्रामीण- 111
•    आजपर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या 10953
•    आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या- 8912
•    आजपर्यंत कोरोनाने झालेले मृत्यू- 172.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image