पुर्व हवेलीत कोरोनाचा कहर; महिनाभरात पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू

पुर्व हवेलीत कोरोनाचा कहर; महिनाभरात पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू

उरुळी कांचन (पुणे) : पुर्व हवेलीमधील सुजान नागरीकांनो आतातरी शहाणे व्हा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, काहीही करा पण कोरोनाला आपल्या व आपल्या प्रियजनांच्या जवळ येऊ देऊ नका, कारण कोरोनाने मागील महिनाभराच्या काळात पुर्व हवेलीमधील पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी येथील दोन खाजगी डॉक्टरांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर दुसरीकडे लोणी काळभोर, उरुळी कांचन, मांजरी बुद्रुकसह पुर्व हवेलीमधील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २८०० वर पोचली आहे. पुर्व हवेलीमधील विविध सोळा ग्रामपंचायत हद्दीत मिळुन सध्या साडेचारशे कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांच्यापैकी तब्बल पंचविसहुन अधिक जनांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैधकिय सुत्रांनी दिली आहे. रुग्णवाढ ही प्रामुख्याने उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर व कुंजीरवाडी या प्रमुख पाच ग्रामपंचायत हद्दीत जादा आहे. 


याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, पु्र्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह दहा विविध ग्रामपंचायचत हद्दीत आत्तापर्यंत तब्बल ७५ जनांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. मागिल पाच महिण्याच्या तुलनेत मागिल महिनाभरात मृत्युचे प्रमाण खुपच मोठ्या प्रमानात वाढले आहे. शासनाकडुन कोरोनाला दुर ठेवण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी, नागरीक अद्यापही उदासिन असल्याने कोरोनाचा प्रादुर्भावच वाढतच चालला आहे. नागरीकांनी सक्तीने मास्क वापरल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव शंभर टक्के कमी होणार आहे. याबाबत आरोग्य विभाग व पोलिस यंत्रनाही मास्कबाबत जनजागृती करत आहेत. नागरीकांना आत्तातरी जागे होण्याची गरज आहे. आपल्या आसपासचे नातेवाईक, ओळखीचे कोरोनामुळे पडद्याच्या आड जात असल्याने, आपणही जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे.

महिनाभरातच पन्नासहून अधिक मृत्यू- 

लोणी काळभोर, उरुळी कांचन, मांजरी बुद्रुकसह पुर्व हवेलीत मागील महिनाभरापासून कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. मागील अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दोन खाजगी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वरील दोन्ही डॉक्टरांच्यावर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील दहा दिवसांपासून उपचार चालु होते. तर लोणी काळभोर (८), मांजरी बुद्रुक (२१), कदमवाकवस्ती (१२), उरुळी कांचन (१५), कोरेगाव मूळ (२), कुंजीरवाडी (४), नायगाव (१), आळंदी म्हातोबाची (२), थेऊर (७), व सोरतापवाडी (३) या दहा ग्रामपंचात हद्दीत कोरोनामुळे आत्तापर्यत ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात पुर्व हवेलीमधील काही  राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. 

पुर्व हवेलीमधील विविध ग्रामपंचायत हद्दीतील रुग्णांची संख्या (कंसात- अॅक्टीव्ह रुग्ण व उपचारानंतर घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या)

उरुळी कांचन- ४५४ (११०-३२९) 

लोणी काळभोर - २९७ (५९-२३०) 
मांजरी बुद्रुक- १०२० (५१-९४८)

कदमवाकवस्ती- ४०८ (५४-३४२)

कुंजीरवाडी- १३३ (४१-८८) 
कोरेगाव मूळ- ३३ (१-३०) 
भवरापूर- १ (०-१)

खामगाव टेक- २ (०-२)

शिंदवणे- २३ (४-१९)
वळती- ६ (१-५) 
टिळेकरवाडी- १५ (९-६)

 नायगाव- ४६ (९-३६)

आळंदी म्हातोबाची- ८२ (३५-४५),  
थेऊर- १४७ (२९-१११)
सोरतापवाडी- ९१ (२८-६०) 

पेठ- ११ ४-७) 
तरडे- १४ (१०-४).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com