esakal | बारामतीत विनाकारण फिरणाऱ्यांकडूनच वाढतोय कोरोना संसर्ग

बोलून बातमी शोधा

corona infection
बारामतीत विनाकारण फिरणाऱ्यांकडूनच वाढतोय कोरोना संसर्ग
sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : ...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विनाकारण रस्त्यावर येणा-यांची पोलिसांनी आज चौकातच अँटीजेन तपासणी केली. शहरात विविध ठिकाणी 125 जणांच्या तपासणीत 12 जण पॉझिटीव्ह आढळले. या बाराही जणांना आपण पॉझिटीव्ह असू याची यत्किंचीतही कल्पना नव्हती पण ते कोरोनाचा प्रसाद लोकांना वाटत बिनधास्त हिंडत होते. आज सकाळपासूनच तीन हत्ती चौक व एमआयडीसीतील पेन्सिल चौकात शहर व तालुका पोलिसांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे व महेश ढवाण यांनी ही कारवाई सुरु केली होती.

हेही वाचा: पुणे : वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता जैववैद्यकीय कचऱ्यासाठी विघटन प्रकल्प

शहरातील तीन हत्ती चौकात 59 जणांपैकी चार तर पेन्सिल चौकात 66 जणांपैकी आठ जण पॉझिटीव्ह निघाले. या बाराही जणांना नजिकच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. वास्तविक ही तपासणी संख्या अजून वाढली असती पण यंत्रणेवर असलेल्या मर्यादा लक्षात घेत नंतर पोलिसांनीच ही कारवाई आटोपती घेतली. मात्र दररोज आता विविध चौकात पोलिस अचानक कारवाई करणार आहेत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त जे लोक रस्त्यावर सापडतील त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. अजूनही लोक कारण नसताना किंवा किरकोळ कारण काढून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन सुरु असतानाही किरकोळ कारण सांगून लोक बिनधास्त बाहेर फिरत आहेत, लोकांनीही काही काळ घरात बसून ही साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे -नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर