कोथरुडमधील सोसायट्यांमध्ये कोरोना तपासणीस सुरुवात

cl.jpg
cl.jpg

कोथरुड : कोरोना महामारी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनेचा भाग म्हणून सोसायटी पातळीवर तपासणी सुरु करण्यात आले आहे. नगरसेवक दीपक मानकर यांच्या उपस्थितीत स्नेह पॅरडाईज सोसायटीमध्ये अँटीजेन तपासणी सुरु करण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष हनुमंत बलकवडे, राम सोनार, पुणे महानगरपालिकेचे विभागीय आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, नवनाथ मोकाशी, कनिष्ठ अभियंता नरेंद्र परदेशी, डॉ. स्नेहल निगडे, दिलीप कानडे आदी उपस्थित होते.

कोथरुड मध्ये पहिला कोरोना रुग्ण सोसायटी भागात आढळला. त्यानंतर वस्ती भागात कोरोनाचा प्रसार वाढला. आता पुन्हा सोसायटी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोसायटी भागात तपासणी वाढविणे गरजेचे होते.

मानकर म्हणाले की, तपासणीत पॉझिटिव्ह आढळणारांवर तातडीने उपचार करुन कोरोना प्रसाराची साखळी रोखता येईल. सध्या राऊत रुग्णालय, अण्णासाहेब पाटील शाळा येथे तपासणी करण्यात येत आहे. नागरीकांच्या सोयीसाठी सोसायटी पातळीवर तपासणी सुरु करण्यात आल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत आहेत.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम म्हणाले की, कोथरुडमध्ये आजपर्यंत एकूण ३७९६ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ३१०१ लोक कोरोना मुक्त झाले तर ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या ६५६ लोकांवर उपचार सुरु आहेत. अँक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी कण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना आखत आहे. कोथरुड डेपो, बावधन प्रभाग १० मध्ये ११७९, शीवतीर्थनगर, रामबाग कॉलनी प्रभाग ११ मध्ये १६३२ व मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी प्रभाग १२ मध्ये ९८५ लोक  आजवर कोरोना बाधित झाले आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com