कोरोनाची टेस्ट करून गावाला आला, पण रिपोर्ट आल्यानंतर... 

corona1
corona1

सोमेश्वरनगर (पुणे) : भोर येथील एक रुग्ण कोरोना चाचणी करून खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथे मूळ गावी आला होता. मात्र, आज चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला बारामती येथे उपचार केले जाणार आहेत. तसचे, बारामती तालुका आरोग्य विभागाकडून त्याच्या कुटुंबियांची तपासणी केली जाणार आहे.

खंडोबाचीवाडी येथील 45 वर्षीय व्यक्ती भोर येथे सरकारी सेवेत आहे. त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यानेही स्वतःहून चाचणी केली. मात्र, कुठलीही लक्षणे जाणवत नसल्याने तो गावी खंडोबाचीवाडी येथे आला होता. मात्र, आज चाचणी पॉझिटिव्ह आली. तो रुग्ण भोर तालुक्यात समाविष्ट झाल्याने त्याला पुन्हा भोरला उपचारासाठी जावे लागणार की बारामतीत दाखल करणार, असा खल सुरू होता. अखेर दोन्ही तालुका प्रशासनाच्या चर्चेनंतर त्यास बारामती येथेच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्ती आहेत. त्यांचीही बारामती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने चाचणी केली जाणार आहे.

याबाबत बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले की, लोकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी. आणि कोरोना रुग्णाबाबत संवेदनशील रहावे.  सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असली, तरी लक्षणे सामान्य आहेत. ते घरातच थांबल्याने संसर्गाचा धोका कमी होणार आहे. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांचीही उद्या चाचणी करण्यात येत आहे. आज रुग्णावर बारामती ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत
  
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com