धक्कादायक! पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाची उपचार केंद्रातच आत्महत्या

Corona patient died at quarantine center in Pune
Corona patient died at quarantine center in Pune

पुणे : कोरोनाबाधित असलेल्या एका रुग्णाने कोरोना उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजता येवलेवाडी परिसरात घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गुंडाप्पा शरणाप्पा शेवरे (वय 55, वर्ष रा.चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे

वीजयंत्रणेविषयी तक्रार आहे? मग मोबाईल घ्या आणि करा 'या' क्रमांकावर व्हाट्सअप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावरील उपचार करण्यासाठी त्यांना चार जुलैला उपचार केंद्रात दाखल केले होते. तेव्हापासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या समवेतचे तीन रुग्ण नाष्टा करण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. त्यावेळी शेवरे हे संबंधीत खोलीमध्येच थांबले. अन्य रुग्ण नाष्टा करुन माघारी आले, तेव्हा त्यांना शेवरे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com