पुण्यात ३४ दिवसांत बाधितांची संख्या चौपट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

पुणे जिल्ह्यात ३४ दिवसांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. गेल्या महिन्यात १६ ते २२ या सात दिवसांमध्ये जेमतेम तीन हजारांचे निदान झाले होते. हे प्रमाण या आठवड्यात साडेबारा हजार झाले आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात ३४ दिवसांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चौपटीने वाढली आहे. गेल्या महिन्यात १६ ते २२ या सात दिवसांमध्ये जेमतेम तीन हजारांचे निदान झाले होते. हे प्रमाण या आठवड्यात साडेबारा हजार झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सुरवातीला पुणे शहरापाठोपाठ शहराजवळील तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नोंदण्यात आले आहे.

No photo description available.

बारामतीत आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू

सात दिवसांमध्ये १२,५०० रुग्ण
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून सात दिवसांमध्ये साडेबारा हजार रुग्णांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली. त्यामुळे सरासरी आठड्याभरात दर दिवशी एक हजार ७८६ रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात १७ हजार रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, तसेच काही रुग्णांना घरात विलग केले आहे. 

पुणे : कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद; कारण...

रुग्णालयात दाखल रुग्ण
पुणे शहर : १३०१३
पिंपरी चिंचवड : ५२२७
पुणे ग्रामीण : २३३५
Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient Increase in Pune