कोरोना पेशंटला लुटणाऱ्या हाॅस्पिटलला दणका 

प्रफुल्ल भंडारी
Tuesday, 6 October 2020

दौंड तालुक्यात एका अधिग्रहीत रूग्णालय व्यवस्थापनाने ४० कोरोनाबाधितांकडून ४ लाख ९८ हजार रुपये जास्त आकारल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम वसूल करून संबंधितांना परत देण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात एका अधिग्रहीत रूग्णालय व्यवस्थापनाने ४० कोरोनाबाधितांकडून ४ लाख ९८ हजार रुपये जास्त आकारल्याचे निष्पन्न झाले आहे. ही रक्कम वसूल करून संबंधितांना परत देण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या लुटीसंबंधी तक्रारी करून पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई झाली. त्यात केडगाव येथील मयुरेश्वर हॅास्पिटलकडून वाढीव बिलांची वसुली आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नसल्याप्रकरणी नागवडे यांनी जिल्हाधिकारी डॅा. राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार एकूण सात शासकीय अधिकारी यांचा समावेश असलेली एक चौकशी समिती नियुक्त केली होती.

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये अवास्तव वैद्यकीय बिले देऊन ४ लाख ९८ हजार रुपये जास्त आकारल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीदरम्यान १०४ रुग्णांवर उपचार झालेले असताना फक्त ७७ जणांच्या फाईल्स तपासणीसाठी देणे, पॅथोलॅाजी व क्ष -किरण रिपोर्टसह आवश्यक नोंदी न ठेवणे, असे एकूण १७ गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. 

पुणे-लोणावळा लोकल १२ ऑक्टोबरपासून होणार सुरू; प्रवासासाठी लागणार पोलिसांचा पास!

वाढीव बिल आकारल्याप्रकरणी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तहसीलदार संजय पाटील यांना सदर रक्कम तत्काळ वसूल करून ती संबंधितांना देण्याचे आदेश दिले आहेत. 

कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवेद्वारे आधार देण्याऐवजी त्यांची लूट करण्याचा दुर्दैवी प्रकार दौंड तालुक्यात घडला. संगनमताने रुग्णांची लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. 
- वैशाली नागवडे, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient robber Action on Daund Hospital