धक्कादायक, आंबेगावातील या 47 गावांमध्ये कोरोनाचा धोका

corona1
corona1

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या बाधित रूग्णांचा आकडा गेल्या महिनाभरात वेगाने वाढत आहे. 12 जून रोजी तालुक्यात फक्त 6 रूग्ण उपचार घेत होते. तालुका कोरोनामुक्त होणार, असे असतानाच रूग्ण संख्या वाढली. आता कालअखेर (ता. 3) 324 रूग्ण बाधित झाले होते. त्यातील 234 रूग्णांना बरे होऊन घरी सोडण्यात आले असून, 85 रूग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात रूग्णांचा आकडा त्रिशतक पार झाला आहे. कोरोना तालुक्यातील 47 गावात पोहचला आहे.   

आंबेगाव तालुक्यात 103 ग्रामपंचायतींपैकी 47 ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यात आदिवासी भागातील चपटेवाडी, फुलवडे, फदालेवाडी- उगलेवाडी, पाटण, जांभोरी या 5 गावात रूग्ण सापडले आहेत. मंचर येथे 84, घोडेगाव येथे 21, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथे 19, महाळुंगे पडवळ येथे 19 रूग्ण सापडल्याने रूग्णसंख्या झपाट्याने वाढली. 5 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 11 कोरोनाबाधित रूग्ण घरी उपचार घेत आहेत. त्यात पिंपळगाव घोडे येथील 7 जण आहेत.     

आंबेगाव तालुक्यात कंटेनमेंट झोनमध्ये अटी कमी केल्या आहेत. मंचर व घोडेगाव येथील व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील व उद्योजक देवेंद्र शहा यांनी बाधित रूग्णांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. कोणत्याही रूग्णाला त्रास होणार नाही, याची दक्षता अधिकारी वर्ग घेताना दिसत आहे. तालुक्यात सध्या गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांचे काम जोरात दिसत आहे. खोडसाळ लोकांना धडा शिकविण्याचे काम पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व सहायक पोलिस निरीक्षक प्रदिप पवार हे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com