पुरंदरमधील 53 गावांत कोरोनाचे थैमान 

corona1
corona1

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 26 रुग्ण वाढले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 562 झाली आहे. तर, सासवड 10 रुग्णांसह 267 वर पोचला आहे. त्यामुळे शहरी भागात व ग्रामीण भागातही काळजी आणि चिंता वाढली आहे. 

सासवड पालिकेने शहरात पाच दिवस बाजारपेठ खुली ठेवली व शनिवार व रविवार बंद ठेवली आहे. दोन दिवसांच्या खंडानंतर आज बाजारपेठ खुली झाल्याने शहरात जत्रेसारखी गर्दी उसळली होती. त्यात रक्षाबंधन असल्याने सर्वत्रच शिस्त न पाळणाऱ्या महाभागांनी फिजीकल डिस्टंन्सिंगची वाट लावून टाकली.

गेल्या चोवीस तासात सासवडला 10, पारगाव मेमाणे येथे आठ, भिवरीत दोन आणि जेजुरी, नीरा, सिंगापूर, देवडी, रिसे,  राजेवाडी येथे प्रत्येकी एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यातून तालुका रुग्ण संख्येत 562 वर पोचला.  सासवड शहर दहाने वाढून 267 वर राहिले. आजअखेर तालुक्यातील तब्बल 53 गावे कोरोनाबाधीत झाली आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com