esakal | पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा १० लाखांचा आकडा पार
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा १० लाखांचा आकडा पार

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांनी मंगळवारी (ता.२५) दहा लाखांचा आकडा पार केला आहे. काल (मंगळवारी) पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १० लाख ३३० झाली आहे. एकूण रुग्ण संख्येत शहरातील ४ लाख ६६ हजार ८५८ रुग्ण आहेत. गेल्या सुमारे सव्वा वर्षातील ही आकडेवारी आहे. या सव्वा वर्षाच्या काळात १६ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ६४२ रुग्ण आहेत. )Corona patients cross 10 lakh mark in Pune district)

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४७ हजार ७२२ झाली आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात आतापर्यंत २ लाख १७ हजार ४४५ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील १४ नगरपालिकांच्या हद्दीत मिळून ५३ हजार ३२७ आणि देहू, खडकी आणि पुणे या तीन कटक मंडळांच्या हद्दीत १४ हजार ९७८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा: पुणे : 115 केंद्रावर लसीकरण, येेथे मिळणार कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन

आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ८ हजार २४७, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ९४२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ९९७, नगरपालिका हद्दीतील ८१५ आणि कटक मंडळातील ३४७ मृत्यू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ लाख ८९ हजार ८२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

साडेनऊ लाख जण कोरोनामुक्त

दरम्यान या सव्वा वर्षाच्या काळात ९ लाख ४५ हजार ९७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ४ लाख ४९ हजार ९१२ जण आहेत

हेही वाचा: उजनीचं पाणी पेटलं; शरद पवारांच्या घराच्या सुरक्षेत वाढ!