अरे वा, पुणे जिल्ह्यातील या भागातून कोरोना हद्दपार 

corona
corona

न्हावरे (पुणे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील कुरुळी येथील मुलगी व वडिल आणि बाभूळसर बुद्रुक येथील एका यू्वकाचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मंजुषा सातपुते- इसवे यांनी दिली. त्यामुळे तालुक्याचा पूर्व भाग कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

बाभूळसर येथील तरुण रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत कामाला जात होता. दहा- बारा दिवसांपूर्वी त्याला त्रास झाल्यामुळे कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्याच्यावर विश्वराज हाॅस्पीटलमध्ये उपचार चालू होते. त्याचदरम्यान भिंवडी (मुंबई) येथून चार जणांचे एक कुटुंब तालुक्यातील कुरुळी  येथे आले होते. त्यांना त्रास झाल्यामुळे तपासणी केली असता, त्यापैकी अगोदर मुलगी व नंतर वडील यांचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर मागील दहा दिवसापासून नोबेल हाॅस्पिटल येथे उपचार चालू होते. त्यांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. 

दरम्यान, ग्रामस्थांनी कामाशिवाय विनाकारण फिरू नये, कामासाठी घराबाहेर आला, तर मास्क वापरावे, सॅनिटाझरचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सातपुते- इसवे यांनी केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com