पुरंदरमधील या गावात कोरोनाचा षटकार

corona
corona

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात आज कोरोनाचे सासवड शहरात दोन, सोनोरी गावात तीन व  वाघापूर येथे एक, असे एकूण सहा रुग्ण सापडले. सोनोरी गावाचा कोरोनाबाधीत आकडा अल्पावधीत सहा झाला आहे. पुरंदर तालुक्यातील तब्बल 22 गावात कोरोना संसर्ग पोचला आहे.

आज सासवड शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दोनने वाढून 81 झाला आहे. तालुक्यातील वाघापूर गावात एक व सोनोरीत तीन रुग्ण सापडले. त्यातून तालुक्यातील रुग्ण संख्या 119 वर पोचली. तसेच, गुरोळी, मांढर व सासवड पाठोपाठ धनकवडी येथे कोरोनाबाधितचा चौथा बळी काल रात्री गेला. कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण साडेतीन टक्क्यांपर्यंत आहे. तर, बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. 40 जण बरे झाले. तब्बल 75 रुग्ण रुग्णालयात आहेत. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

सासवडचा लाॅकडाउन थोडा फायदेशीर ठरतोय, असे वाटत आहे.  शहरातील लाॅकडाउन पंधरा दिवस पुढे नेण्यासारखी दुसरी उपाययोजना हातात नाही. तसेच, पुणे व बाहेर गावाहून ये- जा करणाऱ्यांना होम क्वारंटाइन पद्धतीत रोखले, तर अजून नियंत्रण मिळण्याच्या आशा आहेत. ग्रामीण गावात कोरोनाचा शिरकावाही रोखला पाहिजे.

मात्र, सासवडला निष्काळजीपणा जास्त वाढलेल्या लोकांमुळेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे क्षेत्रही तेच ते व ठराविक आहे. कन्टेन्मेंट झोन सील झाली तर हा संसर्ग रोखणे शक्य होईल. परंतु, कंटेन्मेंट झोन बांबू व पत्रे लावून बंदिस्त केली; तरी हे लोक गावभर फिरत आहेत, असे दिसत आहे. होम क्वारंटाइनला हरताळ न फासल्यास नियंत्रण शक्य आहे. आजही पुरंदर तालुक्यातील एकूणात 70 टक्के रुग्ण एका सासवड शहरातील आहेत. त्यातून सासवड शहरात लक्ष देणे गरजेचे आहे.

तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी रुग्ण संख्येची माहिती दिली. ग्रामीणमधील कंटेन्मेंट झोन व गावेही वाढत आहेत. सासवडचे कंटेन्मेंट झोन तीसपर्यंत गेल्याने नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सासवड शहरात लाॅकडाउन केला. शहरातील  रुग्ण आढळण्यात खंड नसल्याने  तो वाढण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com