भोरमधील या गावांमध्येही आढळले कोरोनाचे रुग्ण 

corona
corona

खेड शिवापूर (पुणे) : भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या अकरा झाली आहे. तर, वेळू (ता. भोर) गावातही कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. दोन दिवसात या परिसरात दहा नवे कोरोना रुग्ण वाढल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

शिंदेवाडी गावात दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या कुटुंबातील एक वृद्ध महिला आणि एक वृद्ध पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील वृद्ध महिला रुग्णाच्या कुटुंबातील सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, त्याच कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात आलेल्या गावातील इतर दोन पुरुषांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार शिंदेवाडी गावात एकूण कोरोना रुग्णांची संख्या अकरा झाली आहे. तर, वेळू गावातही गुरुवारी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला आहे. 

या रुग्णांच्या संपर्कातील आलेल्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती भोर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.

Edited By : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com