esakal | बारामतीकरांची चिंता वाढली, या गावांमध्ये आढळले कोरोनाचे रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील कोरोनाबाधित दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या (हाय रिक्स) संशयित 31 जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते.

बारामतीकरांची चिंता वाढली, या गावांमध्ये आढळले कोरोनाचे रुग्ण 

sakal_logo
By
संतोष आटोळे


शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथील कोरोनाबाधित दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या (हाय रिक्स) संशयित 31 जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते. यापैकी एका 26 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तसेच, कोऱ्हाळे येथे लक्षणे दिसणाऱ्या एका 90 वर्षीय व्यक्तीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली. त्यामुळे बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

पुरंदरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

मूळचे सिद्धेश्वर निंबोडी येथील असलेले व पुणे पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी 17 मे रोजी सुटी काढून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सिद्धेश्वर निंबोडी येथे आले होते. 18 मे रोजी पहाटे ते पुन्हा पुणे मुख्यालयात हजर झाले. मात्र, दोन ते तीन दिवसानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 28 मे रोजी त्यांच्या हाय रिक्स संपर्कात आलेल्या त्यांची आई, वडील, मुलगा व पुतण्या यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये वडील (वय 65) व मुलगा (वय 14) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या 31 जणांनाही ताब्यात घेऊन त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, एका रुग्णामुळे सिध्देश्वर निंबोडीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

शिरूरमध्ये वडिल व मुलाचा विजेचा धक्क्याने मृत्यू  

दरम्यान, बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे एका नव्वद वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी कोठेही प्रवास केल्याची नोंद नाही, मात्र त्यांचा मुलगा भाजीपाल्याची वाहतूक करतो. त्याने पुण्यासह दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या भागतही चिंतेचे वातावरण आहे.