कोरोनाबाबत बारामतीकरांना दिलासा; पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली कमी

मिलिंद संगई
Thursday, 1 October 2020

बारामतीचा कोरोनाचा आलेख कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बारामतीत तपासण्यांच्या तुलनेत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

बारामती : कोरोनाची तीव्रता दिवसागणिक कमी होऊ लागल्याचे आकडेवारीवरुन समोर येऊ लागले आहे. कोरोनाचा ताण आता हलका होऊ लागला आहे. बारामतीचा कोरोनाचा आलेख कमी होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बारामतीत तपासण्यांच्या तुलनेत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास 

बारामतीत प्रतिक्षेत असलेले 55 व काल दिवसभरात झालेले 295 रुग्णांच्या अशा एकूण 350 स्वॅबपैकी 39 जण पॉझिटीव्ह आहे. बारामतीच्या कोरोना रुग्णांनी गेल्या काही दिवसात शंभराचा आकडा पार केला होता. मात्र मधल्या काळात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन झाल्यानंतर आता हळुहळू रुग्णांच्या संख्येचा आकडा कमी होऊ लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती शहरापेक्षा तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक असण्याचे प्रमाण कायमच असल्याने हे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक तपासण्यांवर अजूनही प्रशासनाचा भर आहे. मात्र आता लोकांच्या मनातील भीती दूर झाली असून त्याची जागा आता सतर्कतेने घेतलेली आहे. मास्क, सॅनेटायझर तसेच इतर पूरक बाबींचा वापर वाढलेला दिसत आहे. बारामतीची रुग्णसंख्या जरी 3285 पर्यंत गेलेली असली तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 2513 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मृत्यूचा आकडा 82 वर गेला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालयांवरील ताण कमी होऊ लागला- बारामतीतील सरकारी व खाजगी दोन्ही रुग्णालयांवर गेल्या काही दिवसात जो कमालीचा ताण होता, बेडस उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या ती परिस्थिती आता निवळली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्यामुळे ताण कमी झाला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patients decreased in baramati