पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पूर्व हवेलीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव

जनार्दन दांडगे
Thursday, 19 November 2020

- पंधरा दिवसाच्या गॅपनंतर कोरोनाचा पूर्व हवेलीत पुन्हा शिरकाव,
- बुधवारी एका दिवसात कोरोनाचे नवे २८ रुग्ण.
- मास्क सक्तीने वापरण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन. 

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचन, मांजरी बुद्रुकसह पूर्व हवेलीत कोरोनाने तब्बल पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शिरकाव केल्याचे बुधवारी (ता. १८) दिसून आले आहे.

पूर्व हवेलीत बुधवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल २८ नवे रुग्न आढळून आले असून, नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पूर्व हवेलीवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावू लागले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर (५), उरुळी कांचन (३), मांजरी बुद्रुक (८), कदमवाकवस्ती (२), थेउर (१), कुंजीरवाडी (१), टिळेकरवाडी (१), कोरेगाव मुळ (२), कोलवडी (१), केसनंद (१) व वाघोली (४) या अकरा ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी दिवसभरात तब्बल २८ कोरोनाचे नवीण रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, ''कोरोना टाळायचा असेल तर, नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करण्याची गरज आहे, असे मत हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, डॉ. सचिन खरात यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व हवेलीत उरुळी कांचन येथे २३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, मांजरी बुद्रुक, वाघोलीसह पूर्व हवेलीत कोरोनाना धुमाकुळ घातला होता, मात्र कोरोनाचे वाढता प्रभाव लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने मास्कचा वापर सक्तीचा केला. त्यामुळे मागील महिनाभराच्या काळात पूर्व हवेलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.

लोणी काळभोर व लोणी कंद पोलिसांनी मागील तीन महिन्याच्या काळात मास्कचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरु केल्याने, पूर्व हवेलीमधील कोरोनाचे रुग्ण बोटावर मोजण्याइतपतच उरले होते. मात्र मागील काही दिवसांपासून नागरिकांच्याकडून मास्कचा वापर थांबल्याने, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, डॉ. सचिन खरात म्हणाले, ''मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी सुरु केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे शंभर टक्के नागरिकांनी मास्कचा वापर सुरु केला होता. याचा परिणाम म्हणजे पूर्व हवेलीत मागील महिनाभराच्या काळात कोरोनाच्या नवीण रुग्णांची संख्या मोठ्या प्रमानात कमी झाली होती. मात्र मागिल कांही दिवसापासून नागरिक मास्कचा वापर न करता घराबाहेर पडत असल्याने, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्यास नागरीकांचा भेफिरकरपणा कारणीभुत आहे. यामुळे कोरोनाला रोखावयाचे असेल तर, नागरीकांनी शंभर टक्के मास्कचा वापर करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona re-entered in East Haveli After a fortnight gap