esakal | बारामतीकरांना मोठा दिलासा, 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बारामती कोणत्याही परिस्थितीत कोरोनामुक्त कसे राहील, या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बारामतीत बाहेर गावाहून येणा-यांमुळेच कोरोनाची लागण जास्त होत असल्याचे निष्पन्न होत आहे.

बारामतीकरांना मोठा दिलासा, 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामतीत काल घेण्यात आलेल्या 23 जणांच्या घशातील द्रावाच्या नमुन्यांचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले.  त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

बारामतीत दोन दिवसांपूर्वी पाच जण कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील 54 जणांसह इतर सहा जण, असे एकूण 60 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. दरम्यान, काल पुन्हा 23 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने घेतले गेले. त्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याने पुन्हा काळजीचे वातावरण होते. मात्र, आज या 23 जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले. त्यामुळे बारामतीला दिलासा मिळाला आहे. 

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

असे असले तरी प्रशासनाने मात्र बारामती कोणत्याही परिस्थितीत कोरोनामुक्त कसे राहील, या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. बारामतीत बाहेर गावाहून येणा-यांमुळेच कोरोनाची लागण जास्त होत असल्याचे निष्पन्न होत आहे. ज्यांनी प्रवास केलेला आहे, अशा व्यक्तींमध्येच ही लक्षणे प्रामुख्याने आढळत आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

व्यापाऱ्यांचाही पुढाकार 
बारामती शहरातील व्यापाऱ्यांनीही या लढाईत प्रशासनासोबत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीतील ज्या व्यापाऱ्यांची दुकाने साडेपाच नंतर उघडी असतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे पत्रच बारामती व्यापारी महासंघाने उपविभागीय अधिकारी व पोलिस निरिक्षकांना देऊ केले आहे. 

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली

पोलिसांची तपासणी सुरुच 
मास्कविना फिरणाऱ्या बारामतीकरांवर पोलिस व नगरपालिकेने आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. महत्वाच्या चौकामध्ये मास्कविना फिरणाऱ्यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सर्वांनीच मास्कसह सॅनेटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, असे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.