चक दे...दौंडमधील सर्व 30 पोलिस कोरोनामुक्त

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 29 मे 2020

दौंड राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातमधील सर्व २७ पोलिस व इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) ३ पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र

दौंड (पुणे) : दौंड राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातमधील सर्व २७ पोलिस व इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) ३ पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, शहरातील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या जवळच्या नात्यातील एका ३२ वर्षीय नागरिकास आज कोरोनाची बाधा झाली आहे.

बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास

मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक सातमधील २७ पोलिसांना १ ते १६ मे या कालावधीत कोरोना विषाणूची बाधा झाली होती. हे सर्व २७ कोरोनाबाधित पोलिस उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर सांगली येथे बंदोबस्त पूर्ण करून २७ मे रोजी दौंड शहरात परतलेल्या तुकडीतील ८ पोलिसांचे घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल आज (ता. २९) आला असून, सर्व ८ जण निगेटिव्ह आहेत, अशी माहिती गटाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा. वैशाली खान यांनी दिली.

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

दौंड- सिद्धटेक रस्त्यालगत गोवा गल्ली येथील ७० वर्षीय व्यक्तीला २० मे रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पुणे येथे उपचार सुरू असताना २५ मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित ४८ वर्षीय मुलाला २८ मे रोजी कोरोनाची बाधा झाली. दरम्यान आज (ता. २९) कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व जवळच्या नात्यात असलेल्या ३२ वर्षीय नागरिकासही कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दौंड तालुत्यात २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ३४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका ७० वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आजअखेर बाधितांची संख्या १५ झाली असून, त्यामध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १२ पोलिस, १ नव्वद वर्षीय महिला, १ अठ्ठेचाळीस वर्षीय व एक बत्तीस वर्षीय नागरिक यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona report of all 30 policemen in Daund city came back negative