esakal | कापड दुकानातील महिलेला कोरोना, संपर्कातील 16 जणांना...
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

भिगवण स्टेशन परिसरामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पूर्वी एप्रिलमध्ये एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी (ता. १०) कोरोनाबाधीत झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

कापड दुकानातील महिलेला कोरोना, संपर्कातील 16 जणांना...

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आणखी एका महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी दिली आहे. नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आलेली महिला ही भिगवण येथील एका कापड दुकानामध्ये काम करत होती. त्यामुळे भिगवण शहराला कोरोनाचा धोका वाढला आहे.

जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 

भिगवण स्टेशन परिसरामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पूर्वी एप्रिलमध्ये एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता, तर शुक्रवारी (ता. १०) कोरोनाबाधीत झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या संपर्कातील १४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी बारामती येथे चाचणी करण्यात आलेल्या दोन व्यक्तींच्या चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात महिलेच्या संपर्कातील आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इंदापूर येथे स्वॅब घेण्यात आलेल्या १२ व्यक्तींचे अहवाल आणखी प्रतिक्षेत आहेत. त्याकडे भिगवणकरांचे लक्ष लागले आहे. रुग्णाच्या संपर्कातील आणखी एक महिला कोरोनाबाधीत झाल्यामुळे भिगवण स्टेशनसह भिगवण परिसरास कोरोनाचा धोका वाढला आहे. नव्याने कोरोनाग्रस्त झालेली महिला ही भिगवण येथील एका कापड दुकानामध्ये कामावर होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपर्कातील १६ व्यक्तींना होम कोरंटाइन करण्यात आले आहे. संपर्कातील व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हो मोठा धोका...  

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले की, भिगवण स्टेशन येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आणखी एका महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे भिगवण व परिसराला कोरोना धोका वाढला आहे. भिगवण स्टेशनचा परिसर सील करण्यात आला आहे. भिगवण येथेही प्रशासनाच्या सुचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, अन्यथा थेट कारवाई करण्यात येईल.
 
Edited by : Nilesh Shende