विमानाने निघालात, तर चाचणी करा!

मंगेश कोळपकर
Sunday, 29 November 2020

प्रत्येक राज्यातील विमान प्रवाशांसाठीचा नियम वेगळा आहे. काही राज्यांत कोरोनाची चाचणी केल्यावरच विमानतळावरून प्रवेश मिळणार आहे तर, काही राज्यांत चाचणी सक्तीची करण्यात आलेली नाही. मात्र, निर्धोकपणे फिरायचे असेल तर, कोणत्याही विमानतळावर तपासणीपूर्वीचा किमान ४८ तास आधीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल प्रवाशांनी जवळ बाळगणे गरजेचे ठरणार आहे.

पुणे - प्रत्येक राज्यातील विमान प्रवाशांसाठीचा नियम वेगळा आहे. काही राज्यांत कोरोनाची चाचणी केल्यावरच विमानतळावरून प्रवेश मिळणार आहे तर, काही राज्यांत चाचणी सक्तीची करण्यात आलेली नाही. मात्र, निर्धोकपणे फिरायचे असेल तर, कोणत्याही विमानतळावर तपासणीपूर्वीचा किमान ४८ तास आधीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल प्रवाशांनी जवळ बाळगणे गरजेचे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून विमानातून येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक आहे. तसेच प्रवाशांनी चाचणी केली नसेल तर, पुण्यातील लोहगाव विमानतळावर ती करणे बंधनकारक आहे. याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) दिलेल्या सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर संबंधित राज्यांनी निर्बंध घातले आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्यास संबंधित प्रवाशाला कोणत्याही शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. 

पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?

दिल्ली, आंध प्रदेश, बिहार, चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांत प्रवेश करताना कोरोनाच्या चाचणीची सक्ती नाही. परंतु, तेथे थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. मात्र, केरळ आणि तमिळनाडूत प्रवेश करताना प्रवाशांना ई-पास काढावा लागणार आहे. संबंधित राज्यातील शहरात जाताना विमानातच या बाबतची माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रवासापूर्वीही प्रवासी ई- पास काढू शकतात. गोव्यामध्ये प्रवाशांवर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, त्यांना आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करण्याची सक्ती केली आहे. 

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत

प्रत्येक राज्याचे निर्बंध वेगवेगळे
याबाबत ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ पुणेचे संचालक नीलेश भन्साळी म्हणाले, ‘‘प्रवाशांनी त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी कोरोनाची चाचणी करून घेतल्यावरच प्रवास करावा. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल तर, प्रवास करायला हरकत नाही. प्रत्येक राज्याचे निर्बंध वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रवाशांकडे ४८ तासांतील चाचणी अहवाल असेल तर, त्याला अडचण येण्याची शक्‍यता कमी असेल.’’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Test if you are on a plane