दुसरा डोस मिळेना, रुग्ण संख्या कमी होईना; ग्रामीणमधील स्थिती

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ११ लाख ७२ हजार ४८५ जणांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

पुणे - जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील (Rural Area) ११ लाख ७२ हजार ४८५ जणांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण झाले आहे. या लसीकरणात पहिल्या डोसचे (Dose) प्रमाण अधिक असून, अद्यापही दुसरा डोस मिळेनासा झाला आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणापैकी फक्त २ लाख २९ हजार २६२ जणांनाच दुसरा डोस मिळू शकला आहे. परिणामी पुणे शहर व पिंपरी चिंचवडच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा दर (पॉझिटिव्हिटी रेट) आजही अधिक आहे. (Corona Vaccination Issue in Pune Rural Area Condition)

सद्यःस्थितीत पुणे शहरातील कोरोना बाधितांचा दर पाच टक्के, पिंपरी चिंचवडमधील ५.२ टक्के आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा ९.७ टक्के इतका आहे. या तीनही क्षेत्रातील तुलनात्मक बाधित दर पाहता, सध्या ग्रामीण भागातील सर्वाधिक दर आहे. सध्या शहरात ३ हजार ३२०, पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ५२९ तर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७ हजार ८७२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

Corona Vaccination
बारामतीत निर्बंध शिथील करण्याबाबत दोन दिवसात घेणार निर्णय

ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील मिळून एकूण २९ लाख १४ हजार ६१२ जण कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून ४०.२२ टक्के व्यक्तींचेच लसीकरण पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.

पुणे जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. मात्र या पहिल्या टप्प्यातील ६९ हजार १६५ जणांना अद्यापही दुसरा डोस मिळू शकला नाही. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील सर्व व ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरु केले होते. या टप्प्यात ७ लाख ६४ हजार ४०९ जणांना पहिला डोस दिला आहे. यापैकी केवळ १ लाख ५५ हजार ५५२ जणांनाच दुसरा डोस मिळाला आहे. उर्वरित ६ लाख ८ हजार ८५७ जणांना अद्याप दुसरा डोस मिळू शकला नाही. १८ ते ४४ वयोगटातील फक्त ३८ हजार ९४ जणांना पहिला आणि २ हजार २४५जणांनाच दुसरा डोस दिला आहे.

Corona Vaccination
पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

ग्रामीणमधील कोरोना स्थिती

- आतापर्यंत केलेल्या कोरोना चाचण्या - १२ लाख ८० हजार ५०७

- एकूण कोरोनाबाधितांची संख्या -२ लाख ८५ हजार ४६१

- आतापर्यंतचे एकूण कोरोनामुक्त - २ लाख ७२ हजार ८७९

- एकूण मृत्यू - ४७१०

- सध्याचे सक्रिय रुग्ण - ७ हजार ८७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com