पुरंदर तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी; आता मात्र... 

corona-g.jpg
corona-g.jpg

सासवड : आज सासवड शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा एकदम सातने वाढून.. शहर 71 वरुन 78 वर पोचले. तर आज तालुक्यातील सासवडसह दिवे, बेलसर, वनपुरी व वाघापूर गावात कोरोनाने शिरकावा केला. तालुका कालच शतक ओलांडत पुढे गेला; आज तो 113 वर पोचला. विशेष म्हणजे गुरोळी, मांढर व सासवड पाठोपाठ हा धनकवडीचा तालुक्यातील कोरोनाबाधीतचा चौथा बळी ठरला.

या वाघापूरसह चार गावांसह बाधीत सुपे खुर्द गावात प्रत्येकी एक  - एक म्हणजे ग्रामीणला पाच रुग्ण पाॅझीटिव्ह आले. पैकी दिवे व वनपुरीचे जुन्या रुग्ण संपर्कातील व बेलसर, वाघापूर आणि सुप्यातील रुग्ण नवीन आहेत. सासवडच्या आजच्या पाॅझीटिव्ह एकुण सातपैकी जुन्या रुग्ण संपर्कातील तीन व नवीन चार रुग्ण सापडलेत. येथे काम करणारा पण भोर तालुक्यात राहाणाराही एक रुग्ण आहे; त्याची नोंद भोरकडे झाली. आजही पुरंदर तालुक्यातील एकूणात 70 टक्के रुग्ण एका सासवड शहरातील आहेत. 

याबाबत तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी माहिती दिली. ग्रामीणमधील कन्टेन्मेंट झोन वगळून गावेही वाढत आहेत.
सासवडचे कन्टेन्मेंट झोन तीसपर्यंत गेल्याने नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी  कालपासून सासवड शहरात लाॅकडाऊन केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com