esakal | बारामती शहरात दोन महिन्यांनंतर कोरोना दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बारमती शहरात दोन महिन्यानंतर कोरोनाचा रुग्ण पुन्हा आढळला आहे. एका 29 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे.

बारामती शहरात दोन महिन्यांनंतर कोरोना दाखल

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारमती शहरात दोन महिन्यानंतर कोरोनाचा रुग्ण पुन्हा आढळला आहे. एका 29 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. शहरातील एका खाजगी लॅबमध्ये संबंधित महिलेची तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा शासकीय प्रयोगशाळेत तिची तपासणी उद्या केली जाणार आहे. 

घाबरू नका, तुमच्यासाठी येथे नोकरी उपलब्ध आहे..

महिला कोरोनाबाधित आढळल्यामुळे आमराई परिसरातील सुहासनगर घरकुल जयभिम स्तंभ ते सिध्दार्थनगर चौक ते सचिन काकडे किराणा दुकान ते दामोदरे रॉकेल दुकान ते धनंजय तेलंगे ते वसाहत चौक ते जयभिम स्तंभ सुहासनगर घरकुल चौक ही सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, नागरिकांनी शिथील केलेल्या लॉकडाउनचा गैरफायदा न घेता काळजी घ्यावी, मास्क व सॅनेटायझरचा वापर करावा व अत्यावश्यक गरजेच्या कामासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.