अरे काय खेळ लावलाय लोकांच्या जिवाशी : एकीकडे कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह तर दुसरीकडे...

मंगळवार, 30 जून 2020

वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना टेस्टचे वेगवेगळे अहवाल आल्याने नागरिक संभ्रमित झाले आहेत. कोरोनाचा अहवाल एका खासगी हॉस्पिट्लमध्ये पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह असा आला असून हा नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

विश्रांतवाडी (पुणे) : वेगवेगळ्या रुग्णालयात कोरोना टेस्टचे वेगवेगळे अहवाल आल्याने नागरिक संभ्रमित झाले आहेत. कोरोनाचा अहवाल एका खासगी हॉस्पिट्लमध्ये पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह असा आला असून हा नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

२४ जूनला विश्रांतवाडी येथील एका महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. एका लॅबमध्ये २६ जूनला त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांनी २८ जूनला महापालिका अंतर्गत नेमलेल्या बुधरानी हॉस्पिटलमध्ये चाचणी केली. यामध्ये उकारडे यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे वेगवेगळे अहवाल आल्याने नागरिकांचा गोंधळ उडू लागला आहे. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

दरम्यान, वेगवेगळ्या अहवाल देणाऱ्या खासगी लॅबवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित उकारडे यांनी केली. तसेच नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास अशा परिस्थितीत घाबरून न जाता महापालिका नियुक्त लॅबमध्ये चाचणी करावी.