नौदलातील भरतीसाठी केली मेडिकल, कोरोनाचा रिपोर्ट निघाला पॉझिटिव्ह 

मिलिंद संगई
शुक्रवार, 10 जुलै 2020

या युवकाने खासगी प्रयोगशाळेत ही तपासणी केली होती, त्याला कसलीही लक्षणे नसताना तो पॉझिटिव्ह आढळला. तो धडधाकट आहे. मात्र, तरीही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने आश्चर्य व्यक्त झाले. 

बारामती (पुणे) : बारामती शहर कोरोनामुक्त झाले असे वाटत असतानाच आता पुन्हा कोरोनाचा रुग्ण शहरात सापडला. आज शहरातील भिगवण रस्त्यावरील मोतानगरमधील एका युवकास कोरोनाची बाधा झाली आहे. 

नौदल भरती प्रक्रीयेसाठी पुण्याची वारी करून आलेल्या या युवकाने चाचणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ही चाचणी त्याच्या भरती प्रक्रियेचाच भाग होती. दरम्यान, या युवकाने खासगी प्रयोगशाळेत ही तपासणी केली होती, त्याला कसलीही लक्षणे नसताना तो पॉझिटिव्ह आढळला. तो धडधाकट आहे. मात्र, तरीही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने आश्चर्य व्यक्त झाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लक्षणेच नाही पण कोरोना चाचणी मात्र पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण लक्षणीय वेगाने वाढत असल्याने सर्वांनी काळजी घेण्याची गरज प्रशासनाच्या वतीने बोलून दाखविण्यात येत आहे. 

Edited by : Nilesh Shende 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's report of a youth from Baramati is positive