Coronavirus : चीनवरून पाच महाराष्ट्रीयन परतले राज्यात

Coronavirus Five Maharashtrians returned from China
Coronavirus Five Maharashtrians returned from China

पुणे : मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 32 दिवसांमध्ये 43 हजार 031 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून 274 प्रवासी आले आहेत. दिल्ली आणि मानेसर येथे 14 दिवसांच्या विलगीकरणानंतर वुहानहून आलेले आणखी पाच महाराष्ट्रीय नागरिक राज्यात परतले. करोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.

देशात 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षात 74 जणांना दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत भरती केलेल्यांपैकी 71 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिला आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या 74 पैकी 71 प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई येथील कस्तुरबा आणि पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दोन जण दाखल आहेत.

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

दरम्यान, या महिन्याच्या सुरवातीला चीनमधील 645 भारतीयांना वुहान शहरामधून भारतात आणण्यात आले होते. या सर्व भारतीय नागरिकांना नवी दिल्ली आणि मानेसर येथील लष्करी तळावर 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. प्रयोगशाळेत करोना विषाणूंच्या संसर्गाच्या तपासणीसाठी पाठविलेले त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमूने "निगेटिव्ह' आले आहेत. त्यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले.

मिसेस ट्रम्प जाणार दिल्लीतील शाळेत

विलगीकरणाचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतत आहेत. त्यापैकी 36 जण आतापर्यंत महाराष्ट्रात परतले असून गुरुवारी आणखी पाज राज्यात दाखल झाले. त्यामुळे राज्यात परतणाऱ्यांची संख्या आता 41 झाली आहे. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील 14 दिवसांकरिता या प्रवशांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

निर्भया बलात्कार प्रकरणात आता निवडणूक आयोगाची एन्ट्री

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 खाटा उपलब्ध केल्या आहेत. चीनमधील वुहान शिवाय इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरिता करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 274 पैकी 163 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. पुण्यासह मुंबई, ठाणे, नांदेड, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर आणि सातारा या जिल्ह्यातूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com