वंडर बॉय; अवघ्या चार महिन्यांच्या बाळानं कोरोनाला हरवलं

coronavirus four month baby recovered discharge from hospital
coronavirus four month baby recovered discharge from hospital

पुणे Coronavirus : कोरोनाने जगभर हाहाकार माजविला असतानाच पुण्यातील चार महिन्यांच्या एका चिमुरड्याने मात्र कोरोनाशी मुकाबला करीत; त्याला परतवून लावले आहे. नव्या दुनियेत आलेल्या आणि अजून बाळसेही न धरलेल्या या बाळाने कोरोनाला हरविले आणि मंगळवारी आपले घरही गाठले. कोरोनाची लागण झाल्याने ससूनमध्ये त्याच्यावर उपचार झाले. सलग 14 दिवसांच्या उपचारानंतर बाळ ठणठणीत झाल्याने त्याच्या आई-बाबांसह त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

येरवडा परिसरातील एका कुटुंबातील आजोबांना कोरोना झाल्याने त्यांच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली. तेव्हा; त्या घरातील चार महिन्यांचे बाळ "पॉझिटिव्ह' असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, या बाळाचे आई-बाबांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर 13 एप्रिलला बाळाला ससूनमधील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याच्यासोबत आईही होती. डॉक्टपरांनी स्तनपान करण्यासही परवानगी दिल्याने बाळाला रोज आईचे दूध मिळत होते. त्यानंतरच्या 14 दिवसांनी म्हणजे, मंगळवारी बाळाची दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली; तेव्हा त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आल्याचे त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टीरांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरात आतापर्यंत 1300 रुग्ण
पुण्यात कोरोनाने शिरकाव केलेल्या कोरोनाची तेराशेहून अधिक जणांना लागण झाली असून, आतापर्यंत 79 जणांचा जीव घेतला आहे. त्यातच रोज नव्या रुग्णांचे प्रमाण वाढत पुणेकरांत प्रचंड घबराट आहे. तेव्हाच, चार वर्षाच्या बाळालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, बाळ उपचाराला प्रतिसाद देईल का ? याबाबत साशंकता होती. परंतु, पहिल्या दिवसापासून बाळाची प्रकृती स्थिर राहिली आणि उपचारानंतर बरे झाल्याचे स्पष्ट झाले. याआधी मुंबईत सहा महिन्यांचे बाळ कोरोनामुक्त झाले आहे. पुण्यात दोनशे रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांची भर पडत असली तरी; कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. विविध भागांतील २७ जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले; त्यात चार महिन्याच्या बाळाचाही समावेश असल्याचे ससूनमधील डॉक्ट रांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एका दिवशी 27 जण कोरोनामुक्त 
दरम्यान, पुण्यात मंगळवारी दिवसभरात 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात तब्बल 122 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या दीड महिन्यांत पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्ण सापडल्याने पुणेकर पुन्हा धास्तावले आहेत. त्याशिवाय दोघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 79 जणांचा बळी गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com