coronavirussakal
पुणे
Coronavirus : पुणे शहरात कोविडचा एकही रुग्ण नाही; पाच महिन्यात आढळले होते चारच रुग्ण
आशिया खंडातील इतर देशांमध्ये जरी कोरोना रुग्ण वाढल्याचे वृत्त असले तरी पुण्यात मात्र एकही सक्रिय कोरोना रुग्ण नाही.
पुणे - आशिया खंडातील इतर देशांमध्ये जरी कोरोना रुग्ण वाढल्याचे वृत्त असले तरी पुण्यात मात्र एकही सक्रिय कोरोना रुग्ण नाही. इतकेच नव्हे तर गेल्या पाच महिन्यात अवघ्या चार रुग्णांचे निदान झाले होते. त्या सर्वांना उपचारानंतर घरी देखील सोडले गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखांनी दिली.