Coronavirus : बाहेर पडू नका; घरात बसूनच अशी करा आरोग्य तपासणी !

Coronavirus Get a health checkup at home
Coronavirus Get a health checkup at home

पुणे : कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे सध्या घरीच आहात ना ? घरच्या घरी आरोग्य तपासणी करायची आहे, तर उचला मोबाईल आणि करा कॉल...अन काही मिनिटांतच जाणून घ्या डॉक्टरांच्या मदतीने तुमच्या आरोग्याचे अपडेट्स !

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कर्नाटक, महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांतील काही खासगी कंपन्या, उद्योगसमूह यांनी एकत्र येऊन 'कोविड मदत' ही हेल्पलाईन सुरू केली आहे. सुमारे 10 दिवसापूर्वी महाराष्ट्रात ती सुरू केली आहे. कर्नाटक, पंजाब, ओरिसामध्ये पण ही हेल्पलाईन सुरू झालेली आहे. चारही राज्यांतून सुमारे 1500 डॉक्टर्स सामाजिक जाणिवेच्या जबाबदारीतून स्वेच्छेने या उपक्रमात सहभागी झाले आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढती आहे. महाराष्ट्रातील सुमारे 150 डॉक्टर्स यामध्ये सहभागी झाले आहेत. कॉलर कडून कोणतेही शुल्क प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आकारले जात नाही की कोठे खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात नाही.

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा इशारा

या हेल्पलाइनवरील  9513615550 या मोबाईलवर नागरिकांनी कॉल केला की तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरे दिली की 30 मिनिटांत डॉक्टरांचा फोन येतो. तुमच्या उत्तरांचा आढावा घेऊन ते डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतात. कोरोनाची लक्षणे आढळल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात आणि त्याची माहितीही देतात. कॉलरला जर साधा ताप, सर्दी, डोकेदुखी, अंग दुखत आहे आदी प्रकारचा काही त्रास असेल तर  त्यासाठीची औषधे सांगतात.

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

नागरिकांना गंभीर स्वरूपाचा त्रास किंवा आजार आहे, असे वाटल्यास  तर कोणत्या प्रकारच्या एक्सपर्टला दाखवावे लागेल, याचेही हेल्पलाईनवरील डॉक्टर मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रासह चारही राज्यांत ही हेल्पलाईन सध्या ऍक्टिव्ह झालेली आहे. कोरोनविरुद्धच्या लढ्यात सरकारी यंत्रणांवरील ताण कमी करण्यासाठी हेल्पलाईन काम करीत आहे.

अक्षय कुमारने आता बीएमसीला मोठी रक्कम दान करत योद्धांना म्हणाला #DilseThankyou -

मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, पंजाबी, उडिया आदी भाषांमध्ये स्थानिक गरजेनुसार हेल्पलाइनवर मार्गदर्शन मिळू शकते. या हेल्पलाईनमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळत नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही यात सहभागी झाले आहोत, असे पुण्यातील एका डॉक्टरने 'सकाळ' ला सांगितले. पुण्यात गेल्या 10 दिवसांत 600 कॉल झाले असून त्यात 10 कोरोना संशयित आढळून आले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या सूचनांनुसारच तपासणी
हेल्पलाईनचे  राष्ट्रीय समन्वयक अंशू गौर या बाबत म्हणाले, "कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. चारही राज्यांत तेथील सरकार बरोबर मिळून काम करण्यात येत आहे. कोरोनाच्या उपचार पद्धतीबाबत केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून उपचार सुचविले जातात." महाराष्ट्राच्या सरकारने या बाबत मोलाचे सहकार्य केले असून त्यांच्या परवानगीनेच हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com