पुण्यात कोणत्या भागात, किती कोरोना रुग्ण? कोथरूडकरांनी 'असा' रोखला राक्षस!

टीम ई-सकाळ
रविवार, 26 एप्रिल 2020

सर्वाधिक भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ही संख्या 195 च्या वर गेली आहे. या उलट कोथरूड-बावधन परिसरात लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही बाधितांची संख्याही एकवर राहिली आहे.

पुणे Coronavirus : लॉकडाऊनच्या एक महिन्याच्या कालावधीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने जवळपास दोनशेचा आकडा गाठला असताना, दुसरीकडे मात्र कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरातील नागरिकांनी स्वयंशिस्त दाखविल्यामुळे या विषाणूला रोखण्यात यश मिळविले आहे. या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात या विषाणूच्या बाधितांची संख्या एकवर राहिली आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा - पुण्यात भवानी पेठेतच रुग्ण का वाढले?

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 24 मार्च रोजी राज्यात लॉकडाऊन लागू केले. त्यास आज एक महिना पूर्ण होऊ गेला. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु शहराच्या अनेक भागात यांची कार्यवाही होत नाही. पोलिसांकडून दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या आधीच्या म्हणजे 24 मार्चपर्यंत पुणे शहरात बाधितांची संख्याही 18 होती. मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे ही संख्या कमी होईल, असे मानले जात होते. परंतु या काळात शहराच्या भागात मात्र ही संख्या वाढतच चाललेली असल्याचे दिसून आले आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या ही 960 वर गेली. विशेष म्हणजे त्यामध्ये सर्वाधिक भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ही संख्या 195 च्या वर गेली आहे. या उलट कोथरूड-बावधन परिसरात लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही बाधितांची संख्याही एकवर राहिली आहे. त्या खालोखाल औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील बाधितांची संख्या ही तीनवर राहिली आहे. 

No photo description available.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय निहाय दिलेल्या आकडेवारीवरूनही माहिती समोर आली आहे. कोथरूड, बावधन, औंध- बाणेर या परिसरातील नागरिकांनी दाखविलेल्या स्वयंशिस्तीमुळे या विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत झाली असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. तर या विषाणूची बाधा झालेला राज्यातील पहिला रुग्ण हा सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 9 मार्च रोजी आढळून आला होता. मात्र त्यानंतर 45 दिवस तेथील नागरिकांनी पुरेशी काळजी घेतल्यानंतर बाधितांची संख्या ही केवळ दहा पर्यंत गेली आहे. यावरून येरवडा-कळस आणि धानोरी वगळता शहरातील उपनगरातील नागरिकांनी दाखविलेल्या सामंजस्यामुळे या विषाणूंच्या बाधितांची संख्या वाढू शकली नाही. या उलट पेठा आणि त्या लगतच्या भागात मात्र ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून आले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयानिहाय आकडेवारी (24 मार्च) 

 • भवानीपेठ 195 
 • ढोलेपाटील 134 
 • कसबा-विश्रामबागवाडा 124 
 • शिवाजीनगर घोले रस्ता 110 
 • येरवडा-कळस-धानोरी 104 
 • धनकवडी सहकारनगर 49 
 • वानवडी-रामटेकडी 44 
 • बिबवेवाडी 30 
 • हडपसर -मुंढवा 28 
 • नगररस्ता- वडगाव शेरी 26 
 • कोंढवा-येवलेवाडी 12 
 • सिंहगड रस्ता 10 
 • वारजे- कर्वेनगर 09 
 • औंध- बाणेर 03 
 • कोथरूड- बावधन 01 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pune city ward wise patients Kothrud Bavdhan