नगरसेवक शेवाळे यांचे बांधकाम अनधिकृत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणात न्यायालयाकडे अहवाल सादर करतानादेखील या अधिकाऱ्यांकडून माहिती दडविण्यात आली असल्याचा आरोप पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नवी सदाशिव पेठमधील घर क्रमांक ३४३, ३४४ ए आणि बी ही मिळकत निवासी आहे; परंतु विनापरवाना तेथे महिलांचे वसतिगृह सुरू आहे. या प्रकरणात सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते, त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुनावणी घेतली. दावा दाखल असताना आणि सुनावणी सुरू असतानादेखील शेवाळे यांच्याकडून नगरसेवकपदाचा गैरवापर करून या इमारतीत बेकायदा मोडतोड करून नव्याने बदल व बांधकाम करण्यात आले, त्याची माहिती वेळोवेळी महापालिकेला लेखी स्वरूपात कळविण्यात आली. परंतु सुनावणीवर निकाल देताना प्रशासनाकडून त्याची माहिती दडविण्यात आली. याबाबत नगरसेवक विजय शेवाळे म्हणाले, ‘‘माझ्या मिळकतीबाबत सुधीर काळे यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. इमारत कायदेशीर असून एक फूटही बेकायदा बांधकाम केलेले नाही.’’

Web Title: Corporator Vijay Shewale Illegal Construction