पुण्यात नगरसेविकेच्या पतीचे निधन

pune.jpg
pune.jpg

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथील नगरसेविका ज्योती गोसावी यांचे पती किशोर गोसावी यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगी विदुला, मुलगा युगंधर, आई-वडील आणि परिवार आहे. किशोर हे नगरसेविका ज्योती गोसावी यांचे पती होते. 

संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते. परिसरात त्यांचे सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. हिंगणे खुर्द येथील एकता तरुण मंडळ, युगंधर मित्रा मंडळ, विठ्ठलपार्क मित्र  मंडळ यासह अनेक मंडळात ते प्रमुख होते. सिंहगड रस्ता परिसरात दिवाळीत मोठे किल्ले तयार करणाऱ्या मंडळात त्यांचा मुख्य सहभाग असे. नदीकाठच्या रस्त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला. विठ्ठलवाडी परिसरात नदीचे पाणी शिरल्यावर ते मदत कार्य करण्यात अग्रेसर होते.

माजी आमदार कुमार गोसावी यांचे ते पुतणे होते. तसेच विठ्ठलवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे त्यांचा सक्रिय सहभाग होता. सिंहगड रस्ता हिंगणे विठ्ठलवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com