Cosmos-bank
Cosmos-bank

कॉसमॉसवरील सायबर दरोडा; एकास अटक

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा सायबर दरोडा टाकल्याप्रकरणात आणखी एकास अटक करण्यात आली. 

महम्मद नदीम अकबर अली शेख (वय ३५, रा. गोंडा, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात एकूण १२ आरोपींना अटक झाली आहे. तर चार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सायबर हल्ला प्रकरण ११ ऑगस्ट २०१८ रोजी उघडकीस आले. बॅंकेअधिकारी सुहास गोखले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com