खातेदारांच्या पैशांना धोका नाही - मिलिंद काळे

Cosmos-Bank
Cosmos-Bank

पुणे - 'कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंक ही सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. बॅंकेकडे 14 हजार कोटींच्या ठेवी असून, 10 हजार कोटींचे कर्जवाटप केले आहे, तर दोन हजार कोटींचा "स्व'निधी आणि 25 हजार कोटींचा सेटअप आहे. त्यामुळे बॅंकेच्या एकाही खातेदाराच्या पैशाला धोका नसून, प्रत्येकाचा पैसा सुरक्षित आहे,'' अशी माहिती कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.

सर्वसाधारण सभेत काळे यांनी बॅंकेच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, 'बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. अनपेक्षित घटनांचा आर्थिक व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही आणि होणार नाही. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनाही तोटा झाला आहे. त्यांनीही लाभांशात कपात केली. अनपेक्षित घटना घटल्यामुळेच लाभांशात कपात करावी लागली आहे.''

हॅकर्समुळे झालेल्या 94 कोटींच्या व्यवहाराबद्दल काळे म्हणाले, 'यासंबंधीच्या कायदेशीर बाबी तपासण्यात येत आहेत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत संचालक मंडळ काहीही करू शकत नाही. बॅंकेचे अनुप्तादक कर्ज 1100 कोटी रुपये आहे. गणेशखिंड येथील कॉसमॉस टॉवर ही इमारत बॅंकेच्या 122 कोटींच्या नफ्यातून उभारली आहे. ही सहकारी बॅंकांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. यासंबंधीची माहिती 2010 पासून सभासदांना दिली आहे. पण, दर तीन महिन्यांनी बॅंकेच्या व्यवहारांचा अहवाल देणे शक्‍य नाही. मात्र, ज्या सभासदांना माहिती पाहिजे त्यांना आम्ही देऊ शकतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com