कॉसमॉसचा तपास दहा देशांत करणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हरवर मालवेअर हल्ला करून राज्यभरात 2 कोटी 80 लाख रुपये, तर भारत कॅनडा, हॉंगकॉंगसह 29 देशांमध्ये सुमारे 78 कोटींची रक्कम काढण्यात आली. त्यापैकी प्रमुख दहा देशांमध्ये आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा संस्थांच्या मदतीने तपास सुरू केला असल्याची माहिती राज्याचे सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख विशेष महानिरीक्षक ब्रजेश सिंह यांनी बुधवारी दिली. 

गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयामध्ये ते आले होते. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी पुणे पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यादेखील उपस्थित होत्या. आज दुपारी कॉसमॉस बॅंकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाच्या सदस्यासोबत त्यांची बैठक झाली. 

ब्रजेश सिंह म्हणाले,""भारतासह 29 देशांमध्ये झालेल्या व्यवहारांची चाचपणी सुरू आहे. त्यामध्ये खरे आणि खोटे व्यवहारांची काटेकोर तपासणी सुरू आहे. भारतात जे व्यवहार झाले त्याची चाचपणी करून त्यानुसार वसुली सुरू आहे. ज्या ज्या बॅंकखात्यांमधून हे व्यवहार झाले आहेत, त्यांचीदेखील चौकशी केली जात आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे दिसतात परंतु त्यांना कोअर बॅंकिंग सिस्टीमद्वारे (सीबीएस) त्यांना सूचना मिळालेल्या नाहीत. त्या खात्यांचे व्यवहार तपासले जात आहे. देशाबाहेरील व्यवहारांसाठी 28 देशांपैकी प्रमुख दहा देशांमध्ये ज्यामध्ये सर्वाधिक रकमा काढल्या गेल्या, त्या देशांशी संपर्क साधण्यात आला आहे. व्हिसा कार्ड कंपनीच्या याद्यांची छाननीदेखील सुरू आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये तज्ज्ञ असलेल्या खासगी तपास यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सहकार्याने संबंधित देशांसोबत संवाद सुरू आहे.'' 

स्विफ्ट व्यवहारांचीही लवकरच वसुली 
हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेच्या खात्यामध्ये स्विफ्ट व्यवहारांद्वारे ऑनलाइन रक्कम जमा झाली होती. त्यासंदर्भातदेखील आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेसोबत चर्चा सुरू असून, त्याची वसुली लवकरच केली जाईल. व्हिसा, रूपे कंपनीसोबत सर्व तपास यंत्रणांना सोबत घेऊन योग्य दिशेने तपास सुरू आहे, असे सिंह यांनी सांगितले.

Web Title: Cosmos will be investigated in ten countries