esakal | पुणे महापालिका भवनाच्या स्वच्छतेचा खर्च ठेकेदारामुळे झाला निम्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

पुणे महापालिका भवनाच्या स्वच्छतेचा खर्च ठेकेदारामुळे झाला निम्मा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिका प्रशासनाने महापालिका भवनाची नवी व जुनी इमारत स्वच्छ करण्यासाठी ३ कोटी ११ लाख रुपयांचा खर्च काढला होता. मात्र, निविदा भरताना हे काम ठेकेदाराने फक्त १ कोटी ५५ लाख रुपयात करण्याची तयारी दाखविल्याने हा खर्च निम्म्याने कमी झाला आहे. लोकराज्य स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्थेस हे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. (cost of cleaning pune municipal building due half contractor)

हेही वाचा: पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी

पुणे महापालिकेच्या जुन्या व नवीन इमारतीमधील पॅसेज, शौचालय, मुख्य सभागृह, स्थायी सभागृह, विशेष समिती सभागृह, महापौर यांचे कार्यालय, जुन्या व नवीन इमारतीच्या बाहेरील बाजूच्या साफसफाईच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली होती. या कामासाठी चार ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. यापैकी दोन निविदा अपात्र ठरल्या तर दोन निविदांपैकी एकाने ३६.६ टक्के कमी दराने निविदा सादर केली होती़. तर लोकराज्य संस्थेने ५० टक्के कमी दराने भरली होती. लोकराज्य संस्था केवळ १ कोटी ५५ लाख रुपयात हे काम वर्षभर करणार असल्याने त्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा: ‘नॅक’कडून आकारण्यात येणारे मूल्यांकनाचे शुल्क झाले कमी

याबाबत बोलताना स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (hemant rasane) यांनी सांगितले, "ही निविदा कमी रकमेची असते ती मान्य करावी लागते, त्यानुसार ही ५० टक्के कमी दराने आलेली निविदा मान्य केली. प्रशासनाने निश्‍चीत केलेल्या रकमेपेक्षा हा ठेकेदार कमी पैशात काम करणार आहे. पण त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे."

loading image