किशोरवयीन मुलांना पोलिस निरिक्षकांचे समुपदेशन

संदिप जगदाळे
शुक्रवार, 23 मार्च 2018

हडपसर (पुणे) : आजच्या आधुनिक जगामध्ये महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न वाढायला हवेत. यासाठी कुटुंब, शाळा व समाज हे मुख्य घटक आहेत. तसेच पदवी व शिक्षण हे नैतिकतेला अनुसरून असणे ही काळाची गरज आहे, असे विद्यार्थी हेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत असे प्रतिपादन वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सयाजी गवारे यांनी केले .

आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचलित शैक्षणिक संकुलातील किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी गवारे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी इनामदार, प्रा. शोएब इनामदार, प्रा. जाकीर शेख उपस्थित होते.

गवारे पुढे म्हणाले, विद्यार्थी हेच देशाचे खरे आधारस्तम्भ आहेत असे प्रतिपादन गवारे यांनी केले. त्यामुळे शिक्षण संस्था व पालक यांनी विदयाला घडविण्यासाठी प्रयत्न करायले हवेत. याप्रसंगी महिलांसाठी पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीन बडी कॉप या ऍपद्वारे महिला कर्मचाऱ्यांसाठी व्हॉट्स एप ग्रुप तयार करुन एक लाख महिलांना सहभागी करुन घेतल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी पोलिस काका सेवा याची माहिती देण्यात आली.. याप्रसंगी संस्थेचे गुणवंत कर्मचारी हीना इनामदार, बाबूलाल मनुरे, आबेदा शेख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष फहीम इनामदार व आभार आबेदा मुलानी यांनी केले.

Web Title: Counsel for police inspectors for teenage children