समुपदेशनामुळे दांपत्य आले एकत्र

समुपदेशनामुळे दांपत्य आले एकत्र

पुणे - कौटुंबिक कलहातून संमतीने घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात गेलेल्या उच्चशिक्षित जोडप्यातील वाद वकिलांच्या समुपदेशनामुळे मिटला असून, ते पुन्हा एकत्र आले.  

अशोक आणि मधू (नावे बदललेली) असे या दोघांची नावे. २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर ते पिंपरी भागात राहत. सुरवातीचे काही महिने त्यांचा संसार अगदी सुरळीत चालला. मात्र, काही काळानंतर वैचारिक मतभेदामुळे दोघांचे खटके उडू लागले. वाद वाढल्याने ते जानेवारी २०१८ पासून विभक्त राहत होते. नातेवाइकांनी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर दोघांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये ॲड. संतोष काशीद यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी शिवाजीनगर येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. दावा दाखल झाल्यावर ॲड. काशीद यांनी त्यांचे समुपदेशन केले. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे दोघांनी एकत्र यावे, असे ॲड. काशीद यांनी त्यांना पटवून दिले. समुपदेशनामुळे अनेकांची घरे जोडली जातात. नागरिकांचा वेळ व पैसा वाचतो, असे ॲड. काशीद यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com