मदारशात मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलांचे समुपदेशन

संजय शिदे
रविवार, 29 जुलै 2018

या मुलांना शनिवार व रविवार सुट्टी असल्याने त्यांच्या समुपदेशन आणि मेडिकल तपासणीसाठी ४८ तास लागणार होते. आमदार डॉ गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेतली आणि महिला व बाल विकास आयुक्तांना केलेल्या सुचनेनंतर या पीडित मुलांना न्याय मिळणे शक्य झाले

पुणे  :  पुणे-कात्रज येथील मदरशात मुलांवर अत्याचार झाल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. या घटनेची दखल घेत अामदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तातडीने स्त्री आधार केंद्र पुणे संस्थेतील प्रतिनिधींना पाठवून मुलांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. परंतु स्त्री आधार केंद्राचे प्रतिनिधी तेथे पोहोचले असतांना त्यांच्या निदर्शनास आले की, ते मुले सतत झोपत आहेत. या मुलांना अमली पदार्थ दिलेत की त्यांना कुपोषणामुळे झोप येत आहे का हे शोधणे गरजेचे होते. हा प्रकार गंभीर असल्याचे आ.डॉ.गोऱ्हे यांना कळताच त्यांनी महिला व बाल विकास आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि निवेदन दिले.

या निवेदनात आज (ता.29) रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ३३ मुलांचे मेडिकल आणि समुपदेशन करण्याची सूचना  देण्यत आली.  आयुक्त विपीन शर्मा यांनी या सूचना मान्य करून यांनी शनीवारी (ता. २८) रात्री उशिरा मुलांचे मेडिकल आणि समुपदेशन करण्यात येईल असे कळविले.

महिला व बाल विकास विभागाची टीम आज दि.२९ जुलै, २०१८ रोजी मुलांचे मेडिकल आणि समुपदेशन करण्यात येईल असे सांगितले. तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना ही निवेदन देऊन पोलिसांनी कारवाई करण्याची विनंती केली होती. यानंतर पोलीस आयुक्त शुक्ला दखल घेतली आहे आणि चार समुपदेशक या मुलांचे समुपदेशन करणार असल्याचे आमदार डॉ.गोऱ्हे यांना कळविले.

या मुलांना शनिवार व रविवार सुट्टी असल्याने त्यांच्या समुपदेशन आणि मेडिकल तपासणीसाठी ४८ तास लागणार होते. आमदार डॉ गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेतली आणि महिला व बाल विकास आयुक्तांना केलेल्या सुचनेनंतर या पीडित मुलांना न्याय मिळणे शक्य झाले.

 

Web Title: Counseling of children in cases of sexual abuse in the Madrasas