हेल्मेटविना गाडी चालविणाऱ्यांना सक्तीचे समुपदेशन

हेल्मेटविना गाडी चालविणाऱ्यांना सक्तीचे समुपदेशन

बारामती - दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केले नसेल किंवा चारचाकी चालविताना सीटबेल्ट लावला नसेल तर आता तुमचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त होऊ शकतो. केवळ इतकेच नाही तर तुम्हाला बारामतीच्या कार्यालयात दोन तासांच्या सक्तीच्या समुपदेशनालाही हजर राहावे लागेल. 

हेल्मेटचा वापर न करणा-या तसेच सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणा-या वाहनचालकांविरुध्द येत्या गुरुवारपासून (ता. 24) कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमध्ये दोषी वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्यात येणार असून, दोषी वाहनचालकांना बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन तासांच्या समुपदेशनासाठी हजर राहावे लागणार आहे. 

दर मंगळवार व शुक्रवारी असे समुपदेशन होणार असून, या समुपदेशनाला हजर राहिल्याशिवाय दोषी वाहनचालकांचा खटला निकाली काढला जाणार नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवनह अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी आज दिली. 

विनाहेल्मेट व सीटबेल्ट दुचाकी व चार चाकी वाहन चालविणा-या वाहनचालकावर परवाना जप्तीच्या कारवाईसोबतच दोन तासांच्या समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याची अभिनव शिक्षा करण्यात येणार आहे. शासनानेच तसा निर्णय घेतला आहे. वाहन चालविण्याचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्याची शिक्षा याद्वारे होऊ शकणार आहे. 

समुपदेशनाचा अभिनव मार्ग
नुसता खटला भरुन किंवा परवाना रद्द करुन चालणार नाही. तर दोषी वाहनचालकांचे दोन तासांचे समुपदेशन त्याची सवय बदलण्यास कारणीभूत ठरु शकेल. असा विचार करुन सक्तीचे समुपदेशन घेण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. या समुपदेशनाने किती जणांमध्ये फरक पडतो हे येणारा काळच ठरवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com