रहदारीच्या चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील काउंटडाउन टायमर हवाच

शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे - शहरातील अनेक चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील काउंटडाउन टायमर बऱ्याचदा बंद असातात. बऱ्याचशा वाहतूक नियंत्रक दिव्यांना अशा प्रकाराचा काउंटडाउन टायमरच नसल्याने किती वेळ सिग्नलवर थांबावे लागणार याचा अंदाज येत नाही. त्यानुळे नागरिक बऱ्याचदा सिग्नलवरही आपले वाहन सुरुच ठेवतात. प्रदुषण आणि गर्दीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी सिग्नल यंत्रणेमध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज असून, त्याबद्दल नागरिकांनी दिलेल्या सूचना...

शहरातील काही सिग्नल हे 90 सेकंदापेक्षाही जास्त वेळेचे आहेत. असा वेळेला सिग्नलची वेळ जास्त असलेल्या चौकात टायमर उपयोगी ठरतील. गर्दीचे प्रमाण व सिग्नलचा वेळ याचा ताळमेळ जमला पाहिजे. तसेच वाहन बंद करुन सुरु करे पर्यंत जरा वेळ जातो. अशा वेळी मागच्या गाड्या जोरात हॉर्न वाजवतात व त्यामुळे ध्वनीप्रदुषण होते. त्यामुळे यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच गुरुवारी शहरातील वीज पुरवठा बंद असताना देखील पर्यायी व्यवस्था उपलब्ध असायला हवी. राजपूत वस्तीचा नदीकाठचा रस्ता अरुंद आहे. हा रस्ता पुढे नदीकाठाने राजाराम पुलापर्यंत जोडावा त्यामुळे कर्वे रस्त्यावर गर्दी होणार नाही.
हेमंत भालेराव, पुणे

पुण्यासारख्या शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वाढती संख्या बघता सिग्नलचे टाइमर अतिशय आवश्यक आहेत. महापालिकेने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी.
आशिष चंदनशिवे

सिग्नलला काउंटडाउन टाइमरबरोबरच सिग्नलच्या वेळेचे देखील सुसूत्रीकरण गरजेचे आहे. जेणेकरून एक सिग्नल मिळाल्यास पुढचे सिग्नल मिळतील व दुसऱ्या सिग्नलवर गर्दी होणार नाही. 
लखमीचंद गुलाबानी

शहरात सिग्नलला काउंटडाउनची सोय असल्यास नागरिक नियोजन करून रस्त्याचा वापर करतील.
ज्ञानेश्वर जगताप

शहरातील काही सिग्नलची दुरुस्ती करणे देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ खादी मशीन चौकातील सिग्नल बरेच दिवस झाले बंद आहे. अशा सिग्नलची दुरुस्ती करुन मग टायमरची व्यवस्था करावी.
दिपक सोनावणे

Web Title: countdown timer signal