देशाला बुद्धांच्या विचारांची गरज-अमोल मिटकरी

रमेश मोरे
शनिवार, 12 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. बुद्धांच्या पूर्वी या देशात चार्तुवर्ण व्यवस्था होती. जाती भेद नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जातीची जळमटं काढुन टाकण्यासाठी बुद्धांच्या समता, बंधुतेचा वारसा जपला.

जुनी सांगवी (पुणे) : देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. बुद्धांच्या पूर्वी या देशात चार्तुवर्ण व्यवस्था होती. जाती भेद नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी जातीची जळमटं काढुन टाकण्यासाठी बुद्धांच्या समता, बंधुतेचा वारसा जपला.

बुद्ध या देशाचे मुळ पाईक आहेत आज देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे.असे सांगवी येथे भगवान गौतम बुद्ध,महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात बुद्धांचा संत व महापुरूषांवरील प्रभाव या विषयावर बोलताना व्याख्याते अमोव मिटकरी यांनी व्यक्त केले. ते पुढे बोलताना म्हणाले, १८व्या शतकात बालविवाह,केशवपन,सती जाण्याची पद्धत या रूढी विरूद्ध सावित्रीबाई व जोतीबांनी संघर्ष केला. तर माणसामाणसात धर्म व जातीच्या नावाखाली विभागणा-यांना धडा शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचा देश आज घडविण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संतांवर व अंध भक्तांवर सडकुन टिका केली.

सकाळच्या सत्रात महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात मोठ्या संख्येने महिला,मुलींनी सहभाग घेतला.तक्षशीला महिला संघाने स्वागत गीत व नृत्य सादर केले.महास्थवीर भदन्त ज्ञानज्योती महाथेरो यांच्या धम्मदेसना नंतर अमोल जगताप सी.ई.ओ.खडकी कँन्टोमेंट बोर्ड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री जाधव यांनी केले. सुत्रसंचलन दयानंद चव्हाण यांनी केले. तर आभार सुजाता निकाळजे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी अमरसिंह आदियाल,राहुल काकडे,राहुल वाघमारे,वसंत कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: country needs thoughts of buddha said by amol mitkari