"सिंपल' ठरले देशातील फाईनटेक स्टार्टअप 

India-Finetek-Award
India-Finetek-Award

मिळाले इंडिया फाईनटेक अवॉर्ड मानांकन; पेमेंट सर्विसेस केल्या सुलभ 
पुणे - ग्राहक आणि विक्रेत्यांचे आर्थिक देयकांना सुलभ करणाऱ्या "सिंपल' स्टार्टअपला देशातील "फाईनटेक स्टार्टअप' म्हणून मानांकन प्राप्त झाले आहे. बंगळुरस्थित या स्टार्टअपला इंडिया फाईनटेक अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. विक्रेत्यांचे खातेवही सुलभ करण्यासाठी "ग्राउंडब्रेकींग' तंत्रज्ञान बाजारात आणल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

पुरस्काराचे महत्त्व काय? 
स्मार्ट उपाययोजना आणि वापरकर्त्यासाठी (युजरफ्रेंडली) सुलभ असलेल्या तंत्रज्ञानाला दिला जाणारा हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. इंडियन फाईनटेक फोरमच्या वतीने नवउद्योजक, उद्योगपती आणि उद्योगक्षेत्रातील नेतृत्वाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विश्‍वासार्हता आणि मानव केंद्रित उद्योगांची ओळख या पुरस्काराने होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे 'सिंपल'?
क्रेडीटवर आधारित हे पैसे देवाणघेवाण करणारे ऍप आहे. व्यावसायिकांकडे असलेल्या खाताबुकचेच हे आधुनिक, विश्‍वासार्ह आणि डिजिटल स्वरूप आहे. 2015मध्ये स्थापन झालेल्या या स्टार्टअपचे "सिंपल' हे ऍप जगातील सर्वांत मोठे क्रेडिट आधारित व्यवहार करणारे ऍप आहे. चित्रा चिदानंद आणि नित्यानंद शर्मा यांनी या स्टार्टअपची स्थापना केली आहे.

आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आमच्या आजवरच्या प्रयत्नांचा आणि कष्टाचा हा सन्मान आहे. विक्रेते आणि ग्राहक या दोघांच्या विश्‍वासार्हतेला खरे ठरलेले आणि व्यवहाराची नवी पद्धत बाजारात आणण्यात सिंपल यशस्वी ठरले आहे. 
- नित्यानंद शर्मा, सह-संस्थापक, सिंपल 

फोटो ः 36891 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com