कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली.

मांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये  यशस्वी झाली आहे. रूग्णालयातील सर्जन डॉ. केदार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वीस दिवसांपूर्वी ही शस्रक्रिया केली.

श्रीरामपूर अहमदनगर येथील १२० सेंटीमीटर उंचीच्या व बाहत्तर किलो वजन असलेल्या दिगंबर मुठे या चौतीस वर्षीय व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या व्यक्तीला अतिलठ्ठपणा व कमी उंचीमुळे झोपल्यावर घोरणे व श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला औरंगाबाद येथील उपचारात नॉनइनव्हॅसिव्ह  व्हेंटिलेटर अथवा सीपीएपी  नावाची मशीन वापरण्याचे सुचवले होते. त्यानंतर त्याने नोबेल रूग्णालयात तपासणी केली. 

रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलिप माने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. केदार पाटील, भूलतज्ञ डॉ. एच. के. साळे, डॉ. पल्लवी बुटियानी, डॉ. संगिता चंद्रशेखर, फुफ्फुस तज्ञ् डॉ. राजीव आडकर, फिजिशियन डॉ. रिमा काशिवा, एन्डोक्रानॉलॉजिस्ट डॉ. वर्षा जगताप आदींनी रूग्णाचे शरीर व आरोग्याचा अभ्यास करून त्याच्यावर शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बेड व यंत्रसामुग्रीत आवश्यक ते बदल करून दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतरच्या वीस दिवसात या रूग्णाचे वजन दहा किलोने घटले आहे. पुढील एक-दीड वर्षात ते वीस ते पंचवीस किलोने कमी होईल, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

डॉ. एच. के. साळे म्हणाले,"नोबलमध्ये शस्त्र क्रिया केलेला रुग्ण अकाँड्रोप्लानझिया या अनुवांशिक आजाराने ग्रस्त आहे. हा आजार त्याच्या घरातील इतर पुरुषांमध्येही आहे. अतिलठ्ठ पणा व कमी उंची यामुळे त्याला  घोरणे व श्वास घेण्याचा त्रास होता. झोपेबाबतची तपासणी झाल्यावर असे निद्रशनास आले त्याचा एएचआय  ८२.५ होता. हा निर्देशांक ५ ते १४ असल्यास झोपेत श्वसनात कमी अडथळे येतात. अतिलठ्ठ पणा असल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे हृदयावर ताण पडतो. दिवसा झोप येऊन गाडी चालवताना अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मृत्यू येण्याची शक्यता असते. या रुग्णाला झोपेत बिघाड झाल्यामुळे अनेकदा झोपेतून जाग येते. शिवाय लठ्ठपणामुळे गुढगे दुखीचा त्रास होतो. आम्ही शस्रक्रिया केलेल्या या रुग्णाचा हा त्रास कमी झाला आहे. कमी उंचीच्या स्थूल व्यक्तीवर केलेली ही शस्रक्रिया  देशातील पहिली घटना आहे.'
 

Web Title: The country's first surgery on a low-hight person