जादूटोणा करीत असल्याच्या संशयातून पती-पत्नीचा खून

crime
crime

राजगुरूनगर (पुणे) : महिला जादूटोणा करीत असल्यामुळे गावातील लहान मुलांचा मृत्यू होतो अशा अंधश्रद्धेतून, संबधित कातकरी समाजातील महिलेचा आणि तिच्या पतीचा काहीजणांनी खून केल्याची घटना खेड तालुक्यातील औंढे गावाच्या हद्दीत घडल्याचे गुरुवारी (ता. 8) सकाळी उघडकीस आले. लिलाबाई सुदाम मुकणे (वय 50) आणि नवसु पुनाजी वाघमारे (वय 55, दोघेही मूळ रा. कोहिंडे खुर्द , सध्या रा. औंढे, ता. खेड, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील औंढे या गावात लीलाबाई मुकणे आपले दुसरे पती नवसू वाघमारे यांच्यासोबत एका ओढ्याजवळ झोपडी करून राहत होते. लीलाबाई या मांत्रिक आणि भक्तीण म्हणून परिचित होत्या आणि आजारांवर गावठी उपचार सांगत असत. त्यांच्या जादूटोण्यामुळे गावातील लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करून काहीजण त्यांना शिवीगाळ करीत होते. त्या रागातूनच त्यांचा आणि त्यांचे दुसरे पती नवसू यांचा गुरुवार सकाळपूर्वी म्हणजे बहुधा बुधवारी रात्री धारदार हत्याराने डोक्यात, कानाजवळ व पोटावर वार करून खून करण्यात आल्याची फिर्याद लीलाबाई यांच्या राजू मुकणे या मुलाने खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीमध्ये त्यांनी तिघांवर संशय व्यक्त केला आहे. घटनेच्या ठिकाणापासून कहाणी अंतरावर दारूच्या बाटल्या व काठ्या आढळून आल्या आहेत. तसेच एक पाकीट व त्यामध्ये एकाचे ओळखपत्रही सापडले आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल कला असून पाच ते सात जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com