दुचाकीवरील प्रवासातून दांपत्याचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

कात्रज - छत्तीस तासांत पंचवीसशे किलोमीटरचे अंतर साडेतीनशे सीसीच्या दुचाकीने पूर्ण करून ‘बन बर्नर’ हे जागतिक आव्हान मोरे दांपत्याने दोन तास आधी पूर्ण करून जागतिक विक्रम केला. या अवघड आणि अशक्‍यप्राय प्रवासात ‘रुग्णवाहिकेला रस्ता द्या’ असा संदेश त्यांनी तीन राज्यांत पोचवला.

वेगावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला अमेरिकेतील ‘आयर्न बट असोसिएशनच्या’ ‘सॅडल सोर’ आणि ‘बन बर्नर’ या आव्हानांनी भुरळ पाडली आहे. वाढत्या बुलेटस्वारांची संख्या अशा विक्रमाकडे आकर्षित होत आहे. पुण्यातील ‘फ्रिसोल्स’ या बायकर्स ग्रुपच्या अनेक सदस्यांनी असे विक्रम पूर्ण केले आहेत; मात्र नऱ्हे येथील हेमंत व प्रियांका मोरे या दांपत्याने छत्तीस तासांतच पंचवीसशे किलोमीटरच्या अंतराचे आव्हान पूर्ण केले. संकेत कात्रजकर यानेही त्यांना उत्तम साथ दिली. २२ डिसेंबरला पहाटे अडीचला आंबेगाव येथून त्यांचा प्रवास सुरू झाला. आव्हान पूर्ण करण्याची जिद्द आणि मानसिक तयारी ठेवल्यामुळे महाराष्ट्रात दाखल होताच वेग वाढला आणि दोन तास आधीच हे आव्हान या स्पर्धकांनी पूर्ण केले. 

Web Title: couple record on two wheeler journey